तंत्रज्ञान

गुगलवर विहिरी कशा शोधाव्यात

0 votes

सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु आहे. पाण्याची उपलब्धता हा ऐन उन्हाळ्यात सर्वाना भेडसावणारा एक प्रमुख प्रश्न. वाढती लोकसंख्या, वाढते वाहतुकीकरण आणि वाढते शहरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न सर्वत्रच उदभवत आहे. विहिरी, नद्या, तळे, असे पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. अशा वाढत्या समस्येमुळे असे स्त्रोत अंशत: नाहीसे होत चालले आहेत.
वाढत्या जगात सध्या संगणकाचे युग देखील तितक्याच वेगात चौफेर वाढलेले आहे. इंटरनेट मायाजाल दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. चला तर मग… आज आपण याच इंटरनेट सुविधेचा वापर करून नवीन काहीतरी पर्यावरण-उपयुक्त अशा योजना करूयात.

गुगल मॅप्स (Google Maps) : विहिरी शोधण्याचे आधुनिक तंत्र :-
Google Logo

आज आपणास सर्वाना ‘गुगल’ हे सर्च इंजिन ज्ञात आहेच.शिवाय गुगलचे ‘गुगलमॅप्स (Google Maps)’ ही सुविधा देखील माहित असेलच… असो…!
गुगलमॅप्स (Google Maps) हे असे वेब बेसड सोफ्ट्वेअर आहे की ज्याचा आपण वापर करून आपण आपली घरे शोधण्याचा प्रयत्न केला. आता आपण या सुविधेचा वापर करून विहिरी तसेच अन्य पाण्याचे स्त्रोत शोधूयात.
‘गुगलमॅप्स’नावाचेएंड्रॉयड (Android), iOS अप्लिकेशन उपलब्ध आहे. ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावे. तत्पुर्वी आपण जर संगणकाचा वापर करत असाल तर आपल्या वेब ब्राऊजरच्या अड्रेस बारमध्ये http:/www.google.co.in/maps/ हा पत्ता enter करावा. नंतर Search Google Maps इथे ज्या ठिकाणच्या विहिरी शोधावायाच्या आहेत ते ठिकाण नमूद करावे.

Google Maps Logo

 

Google Maps application on Apple iPhone (iOS application)

 

 

नंतर Settings मध्ये जाऊन satellite हा Option सिलेक्ट करावा.

आता हळूहळू तो Area अथवा ते गाव Zoom In करा.

उजवीकडे-डावीकडे स्क्रोल केल्यास खालील पद्धतीचे काही मार्कस आढळतात. खालील चित्र पहा.

अशी खुण अथवा काळ्या / हिरवट / निळ्या रंगाचे असणारे हेच ते पाण्याचे स्त्रोत आहेत. अश्या पद्धतीने आपण याच Google Maps वापर करून आपल्या जवळ असणारे पाण्याचे विविध स्त्रोत अगदी सहजरीत्या शोधू शकतो. कालानुरूप, नामशेष होत चाललेले असे पाण्याचे स्त्रोत नामशेष होत चाललेले आहेत. चला तर मग… असे आपण पाण्याचे स्त्रोत शोधूयात आणि नव्याने या येणाऱ्या दुष्काळासारख्या संकटावर मात करूयात…

Mobile Apps डाउनलोड करण्यासाठी खालील QR कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करा.

Be the First to comment. Read More